राजपथवर ‘नो फ्लाईंग झोन’ करणं अशक्य – भारत

January 18, 2015 1:50 PM0 commentsViews:

tricolour

18 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौर्‍यावर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राजपथाला ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्याची अमेरिकेची मागणी भारताने फेटाळली आहे.

ओबामा यांच्या भारत दौर्‍यापूर्वी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा भारताच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात आली होती. या यंत्रणेने भारताकडे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राजपथवरून लढावू विमानांच्या उड्डाणास परवानगी न देण्याची मागणी केली होती. पण, भारताने ही मागणी फेटाळत परंपरेनुसार विमानांची प्रात्यक्षिके होणार असल्याचे म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावरून लढाऊ विमानांनी उड्डाण करणं ही भारताची परंपरा असल्याचं भारतातर्फे अमेरिकेला कळवण्यात आले आहे.

बराक ओबामा 25 ते 27 जानेवारीदरम्यान भारत दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते आग्रा येथे जाऊन ताजमहालला भेट देणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close