काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

January 18, 2015 3:20 PM0 commentsViews:

JK firing

18 जानेवारी :  काश्मीरमध्ये सोपोर जिल्ह्यातल्या एका गावात लपलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

सोपोर शहराजवळच्या एका गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानां मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा रक्षकांनी गावात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले. त्यावेळी एका घरातून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close