एबी डिव्हिलियर्सचे सुपरफास्ट शतक, अवघ्या 31 चेंडूत ठोकले शतक

January 18, 2015 6:36 PM0 commentsViews:

s,africa fastest player

18 जानेवारी :   साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलर्सने सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम रचला आहे. डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकलं आहे. वन डे सामन्यात हा नवा रेकॉर्ड आहे.

यापूर्वी न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने 36 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. त्याचा विक्रम आता डिव्हिलियर्सने मोडीत काढला.

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीनही फलंदाजांनी शतकं ठोकली आहेत. हशिम अमलानं 140 चेंडूंत 14 चौकारांसह नाबाद 153 धावांची तर रिली रोसूनं 115 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. पण त्या दोघांपेक्षाही कळस केला तो एबी डिव्हिलियर्सने, त्याने 44 चेंडूंत 9 चौकार आणि तब्बल 16 षटकारांसह 149 धावा कुटल्या. डिव्हिलियर्सच्या तडाखेबाज खेळीने साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध 439 धावांचे डोंगर रचले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close