मॉल्स – मल्टिप्लेक्सच्या वीज सवलतीला स्थगिती

August 28, 2009 1:31 PM0 commentsViews: 2

28 ऑगस्टमॉल्स आणि मल्टिप्लेक्स यांच्या वीजदरात कपात करण्याच्या MERC च्या निर्णयाला सरकारनं स्थगिती दिली आहे.सर्वसामान्यांच्या वीजदरात MERC नं 4 टक्क्यांच्या वाढ केली होती. पण मॉल्स – मल्टिप्लेक्सना वीजदरात सवलत दिली होती. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. शुक्रवार संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर शनिवारपासून आंदोलन करू, असं राज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनं हस्तक्षेप करत MERC च्या 17 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली. ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.

close