सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण अत्यवस्थ

January 19, 2015 11:30 AM0 commentsViews:

r k laxman

19 जानेवारी :  सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

आर. के. लक्ष्मण 94 वर्षाचे आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मण यांना गेल्या काही दिवसांपासून किडनीचा त्रास आहे. शनिवारी त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर डायलिसिस करण्यात आले. ते उपचाराला काही प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

आर. के. लक्ष्मण यांचे ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशके चर्चेत राहिले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close