काँग्रेस, भाजपकडून पैसे घ्या पण मत ‘आप’लाच द्या – केजरीवाल

January 19, 2015 1:31 PM0 commentsViews:

Arvind Kejriwal meets people
19 जानेवारी :   निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपनं मतांसाठी पैसे दिले तर ते घ्या पण आपलं मत ‘आप’लाच द्या, असे आवाहन ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंग चढायला सुरूवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीकरांनो काँग्रेस आणि भाजपकडून पैसे घ्या, पण मतं त्यांना देऊ नका असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत झालेल्या एका प्रचार सभेत केजरीवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. केजरीवाल यांच्या या विधानावरून आता वाद उभा राहिला आहे. या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसने आता अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. केजरीवाल यांनी मतदारांना पैसे घेण्यासाठी चिथावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर केजरीवाल यांनी मतदारांचा अपमान केला आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते विजय गोयल यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close