आघाडीबाबत काँग्रेसकडून अजून प्रस्ताव नाही – पवार

August 28, 2009 1:35 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्टआगामी विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून अजून आलेला नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मसुदा तयार झाल्याचं सागून पवारांनी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेतसुद्धा दिले. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलिन करावी, तसंच काँग्रेसनं राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, या दिग्विजय सिंग आणि विलासराव देशमुख यांच्या सल्ल्याचाही समाचार पवारांनी घेतला.

close