अडवाणींनी घेतली मोहन भागवतांची भेट

August 29, 2009 11:04 AM0 commentsViews: 6

29 ऑगस्ट लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुषमा स्वराज यांच्यकडे लोकसभेचं विरोधीपक्ष नेतेपद देण्याची संघाची तयारी सुरु असल्याचं समजतं. तर मोहन भागवत यांनी शनिवारी भाजपनेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांच लक्ष लागलं आहे. राजीनामा देण्यासाठी संघ अडवणी आणि राजनाथसिंह यांच्यावर दबाव वाढवत असल्याचं सुत्रांकडून समजतंय. मात्र भाजपामध्ये कोणतेच फेरबदल होणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

close