राजू शेट्टींनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र

August 29, 2009 11:11 AM0 commentsViews: 3

29ऑगस्टराजू शेट्टींनी शरद पवारांची तक्रार करणारं पत्र पंतप्रधानांना लिहीलं आहे. सत्यव्रत चतुर्वेदी आणि सोनिया गांधी पाठोपाठ आता खासदार राजू शेट्टी यांनीही पवारांवर तोफ डागली आहे. वर्षभरापूर्वी पर्यंत साखर निर्यात करणार्‍या भारताला आता अचानक साखर आयात का करावी लागते असा प्रश्नही त्यांनी केला आहे. साखरेच्या निर्यात आणि आयातीच्या दरात प्रतीटन तब्बल 16 हजार रुपयांची तफावत आहे. तर हा पैसा गेला कोठे याची सखोल चोकशी व्हावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. आणि या व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता केला. दरम्यान राजू शेट्टीच्या आरोपांवर शरद पवारांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.

close