नितेश राणेंचं चक्क भजन आंदोलन

January 19, 2015 8:43 PM0 commentsViews:

nitesh_rane_andolan19 जानेवारी : काँग्रेस कार्यक र्त्यांनी चक्क भजन गात अभिनव आंदोलन केलंय. कणकवलीचे आमदार नितेश नारायण राणे यानी आज (सोमवारी) सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकार विरोधातली चक्क भजनं गात धरणं आंदोलन केलं.

सरकारने थांबवलेली शेतकर्‍यांकडची भात खरेदी ताबडतोब सुरू करावी तसंच आंबा आणि काजू नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

शिवसेना-भाजपचे कोकणातून 23 आमदार निवडून गेले असताना शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांनी केली. नाहीतर मंत्र्यांना कोकणात फिरू देणार नसल्याचा इशाराही नितेश राणे यांनी दिलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close