अखेर भाजपला मित्रपक्ष आठवले पण आठवलेंनाच विसरले !

January 19, 2015 9:19 PM1 commentViews:

bjp on rpi34 19 जानेवारी : अखेर फडणवीस सरकारला आपल्या मित्रपक्षांची आठवण आलीये. विधानपरिषदेसाठी भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी तीन जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून विधानपरिषदेसाठी 4 जागांसाठी 6 नावांवर चर्चा सुरू आहे. त्यापैकी दोन जागेसाठी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांची नावं निश्चित झालीये. तर महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपला रिपाइंचे नेते रामदास आठवलेंचा विसर पडलाय.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. रिपाइंचे नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी भाजपसोबत मोठ-मोठ्या आश्वासनाच्या बळावर भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. निकालाअंती भाजप सत्तेवर विराजमान झालं आणि फडणवीस सरकारचं दोनदा खातेवाटप झालंही पण तरीही मित्रपक्षांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस भाजपला मित्रपक्षांची आठवण आली असून विधानपरिषदेसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. विधान परिषदेसाठी भाजपकडून 4 जागांसाठी 6 नावं चर्चेत आहेत. मित्रपक्षांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी विनायक मेटे आणि सुभाष देसाई यांची नावं निश्चित झाली आहे. तसंच एका जागेसाठी महादेव जानकर किंवा सदाभाऊ खोत यापैकी एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. तसंच माधव भांडारी किंवा शायना एन.सी. यापैकी एकाचं नाव वर्णी लागणार आहे. मात्र, रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना यातूनही वगळण्यात आल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कुणाचं नावं तिसर्‍या जागेसाठी निश्चित होतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Batman

    bhajpane aplya mitrana yogya nyay dene garjche ahe. jankar, athvle,shetti,khot, sare zunzar ahet,bhapla yancha faydach hoil.

close