आघाडी सरकारला शंभर दिवसपूर्ण

August 29, 2009 12:35 PM0 commentsViews: 8

29 ऑगस्टयुपीए आघाडी सरकारचा आज 100वा दिवस पूर्ण झाली, पण कोणताही मोठ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलेलं नाही. आधी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 100 दिवसांच्या कामांचा अहवालही प्रसिद्ध करण्यात येणार होता. मात्र अनेक मंत्र्यांनी त्यांना दिलेलं विकासकामांचं टार्गेटच गाठलेलं नाही. त्यामुळे सगळेच प्रस्ताव गुंडाळून ठेवणयात आले आहेत. एवढच नाही तर पंचप्रधानही NREGA च्या कार्यक्रमासाठी बारमेरला जाणार आहे. कारण मनमोहनसिंगही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. ONGC चा 5 हजार 260 कोटींच्या मेगाप्रोजेक्टचा शुभारंभ करून प्रधानमंत्री हा युपीए आघाडी सरकारचा 100वा दिवस साजरा करणार होते. पण तो पुढे ढकलण्यात आला आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या डेडलाईन हुकल्या आहेत. कित्येक प्रकल्पांना मुदतवाढ देण्याशिवाय सरकारला पर्याय नाही.

close