ऑन ड्युटी ‘फूल टाईट’, सरकारी बाबूचा कार्यालयात धिंगाणा

January 19, 2015 9:05 PM0 commentsViews:

19 जानेवारी : अमरावतीमध्ये वायरलेस विभागाचे उपअधिक्षक नितीन जुवेकर यांनी दारू पिऊन कार्यालयातच धुमाकूळ घातला. याविषयी कर्मचार्‍यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जुवेकरांना ताब्यात घेतलंय. जुवेकर यांनी इतकी दारू प्यायली होती की अक्षरश: चार पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत बसवलं. विशेष म्हणजे जुवेकर यांनी अगोदरही असाच राडा केला होता. कर्मचार्‍यांनी याबाबत तक्रारही केली होती. पण तेव्हा हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न वरिष्ठांकडून करण्यात आले होते. पोलिसांच्या कामकाजात वायरलेस विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग समजला जातो. या विभागातला अधिकारी जर अशा अवस्थेत काम करत असेल तर या विभागाच्या एकूण कामकाजाविषयीच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close