यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत घसरण

August 31, 2009 6:57 AM0 commentsViews: 4

31 ऑगस्टदेशाच्या जीडीपी दरात यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत घट झाली आहे.गेल्यावर्षी 7.8 टक्के असणारा जीडीपी दर यावर्षी पहिल्या तिमाहीत घटून 6.1 टक्के झाला आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असूनही कृषीक्षेत्राचा विकासदर गेल्यावर्षीच्या 3.1 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 2.4 टक्के झाला आहे. निर्माण क्षेत्राचाही विकासदर घटलाय, हा दर 5.5 टक्क्यांवरुन 3.4 टक्के झाला आहे. बांधकाम क्षेत्राचाही विकासदर मंदावला आणि हा दर 8.4 टक्क्यांवरुन 7.1 टक्के इतका खाली आला आहे.उद्योग क्षेत्राचा विकासदर 6 टक्क्यांवरुन 5 टक्के इतका घसरला आहे.सर्वात जास्तती रोजगार क्षेत्राच्या विकासदरात झाली आहे.हा दर 10.2 टक्क्यांवरुन एकदम 7.8 टक्के इतका घटला आहे.या सर्वाला अपवाद फक्त खाणक्षेत्राचाही ठरला, या क्षेत्राच्या विकासदरानं 4.6 टक्क्यांवरुन 7.9 टक्के इतकी झेप घेतली आहे.

close