दिल्लीचा आखाडा तापला, केजरीवालांचं आव्हान बेदींनी टोलवलं !

January 20, 2015 9:42 PM0 commentsViews:

kejriwal vs bedi20 जानेवारी : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी दोघंही आज आपले उमेदवारी अर्ज भरणार होते. हे निमित्त साधत केजरीवाल यांनी सकाळीच मुख्यमंत्रिपदाच्या सर्वच उमेदवारांना ट्विटरवरून खुल्या चर्चेचं आव्हान देत गुगली टाकली. अर्थात किरण बेदींनी हे आव्हान स्वीकारलं नाही. एकूणच दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता खरे रंग भरायला सुरुवात झालीय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकीत सर्वांचं लक्ष असेल या तिघांवर…गेल्या निवडणुकीप्रमाणेच केजरीवाल या निवडणुकीतही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत दिल्लीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांनी खुली चर्चा करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. आणि काँग्रेसनं हे आव्हान तात्काळ स्वीकारलं.पण, भाजपनं हे आव्हान लिलया टोलवलं.

भाजपनं चर्चेपासून पळ काढला, असं म्हणण्याची संधी यामुळे ‘आप’ला मिळाली. दरम्यान, केजरीवाल उमेदवारी अर्ज भरणार होते. पण, अपेक्षित गर्दी जमेपर्यंत उशीर झाला आणि त्यामुळे केजरीवाल यांना आपला रोडशो मध्येच थांबवावा लागला. आता ते बुधवारी अर्ज भरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close