बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अखंड प्रेरणाज्योत

January 20, 2015 9:57 PM0 commentsViews:

balasaheb_shivajipark20 जानेवारी : मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अखंड प्रेरणाज्योत बसवण्यात आली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ही प्रेरणाज्योत बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी पाहणी केली. येत्या 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनापासून ही ज्योत अखंड तेवत राहणार आहे.

तिची संपूर्ण देखभाल महानगर गॅस, भारत पेट्रोलियम करणार असून, त्याचा खर्च महापालिका उचलणार आहे.

दरम्यान, बाळासाहेबांचं स्मारक हे दादर परिसरातच व्हावं अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गुगल पोर्टलवर बाळासाहेबांचं डूडल करण्याची मागणीही त्यांनी गूगलकडे केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close