बेल्जियम ग्रांप्रिमध्ये भारताच्या फोर्स वन टीमचा यानकार्लो फिशिके दुसरा

August 31, 2009 7:08 AM0 commentsViews: 1

31 ऑगस्टरविवारची बेल्जियम ग्रांप्रि भारतासाठी ऐतिहासिक ठरली. भारताच्या फोर्स वन टीमचा डायव्हर यानकार्लो फिशिकेला या रेसमध्ये दुसरा आला. त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय टीमने पॉइंट मिळवले. काल झालेल्या क्वालिफायिंग रेसमध्ये फिशिकेलाने पेल पोझीशन मिळवली होती. त्याने पहिल्या क्रमांकावरुन रेस सुरु केली. आणि कामगिरीत सातत्य राखत रेसमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. रेसमध्ये सुरुवातीला फिशिकेलाच आघाडीवर होता. पण दुसर्‍या वळणावर किमी रायकननने त्याला मागे टाकलं आणि आघाडी मिळवली. ती शेवटपर्यंत टिकवत त्याने ही रेस जिंकली. या विजयामुळे टीमचे मालक विजय माल्या भलतेच खुश झाले आहेत. या हंगामात टीमने मिळवलेले हे पहिले पॉइंट. आणि पहिल्या तीनात येण्याची फोर्स वन टीमची ही पहिलीच खेप आहे.

close