पुण्यात विसर्जनमिरवणूक 24 तासांच्या आत संपवण्याचा मंडळांचा निर्णय

August 31, 2009 9:44 AM0 commentsViews: 1

31 ऑगस्टH1N1च्या सावटामुळे पुण्यातल्या गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणूक 24 तासात संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मानाच्या कसबा गणपती मंडळानं पुढाकार घेतला आहे. इतर 100 मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मिरवणूक 24 तासात संपवण्याचं आवाहन केलं होतं. पुण्यात सुमारे साडेतीन हजार सार्वजनिक मंडळं आहेत. पुण्याची विसर्जन मिरवणूक दरवर्षी 28 ते 30 तास चालते. पण यंदा H1N1 च्या संसर्गामुळं पुण्यात 31 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्यामुळे पुण्यात गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जात आहे. बहुतेक मंडळांनी सजावटी, देखावे तसंच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले होते. बाहेर गावाहून गणपती पाहायला येणार्‍या गणेश भक्तांच्या संख्येतही यंदा घट झाली आहे.

close