युएस ओपनला सोमवार पासून होणार सुरवात

August 31, 2009 9:48 AM0 commentsViews: 3

31 ऑगस्टयु एस ओपनला सोमवारपासुन न्युयॉर्कमध्ये सुरुवात होत आहे. रॉजर फेडरर त्याचं सहावं युएस ओपन टायटल जिंकतो का याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं असेल. त्याचसोबत त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालसुध्दा यु एस ओपन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महिलामध्येही यंदा जोरदार चुरस आहे. पण विजेतेपदासाठी गतविजेती सेरेना विल्यम्स प्रमुख दावेदार मानली जात आहे. तिला कडवी टक्कर द्यावी लागणार आहे, ती तिची बहीण विनस विल्यम्यशी. त्याचसोबत वर्ल्ड नंबर वन दिनारा साफिना, एलेना दिमेंतिएव्हा आणि फ्रेंच ओपन विजेती स्वेतलाना कुझनेत्सोवाही या शर्यतीत आहेत. पण भारतीय फॅन्सची नजरही यू एस ओपनवर लागली आहे. कारण पहिल्यांदाच भारताच्या सोमदेव देवबर्मनने यूएस ओपनमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. सोमदेव करिअरमध्ये पहिल्यांदाच एक ग्रँड स्लॅम खेळणार आहे.

close