बेळगावातल्या नाट्यनगरीला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

January 21, 2015 9:12 AM0 commentsViews:

natya samelan

21  जानेवारी :  95व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संमेलनस्थळाला बाळासाहेब ठाकरे नगरी असे नाव देण्यात येणार असून नाट्यसंमेलनाच्या मुख्य मंचाला स्मिता तळवलकर यांचे नाव देण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 7 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

संमेलनानिमित्त 1-5 फेब्रुवारीदरम्यान नाट्यमहोत्सव भरविण्यात येणार आहे. 6-8 फेब्रुवारी या कालावधीत नाट्यसंमेलनात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि सचिव दीपक करंजीकर यांनी दिली. संमेलनाच्या व्यासपीठावर कोणतीही राजकीय व्यक्ती असणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

नाट्यसंमेलनाचा 8 फेब्रुवारी रोजी समारोप होणार असून, श्रीरंग गोडबोले हे 100 वर्षांची रंगभूमीची वाटचाल कार्यक्रमातून उलगडून दाखविणार आहेत. समारोप कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. नाट्यसंमेलनात एकूण तीन बालनाट्ये सादर करण्यात येणार आहेत.

 95 वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन : 6, 7 आणि 8 फेब्रुवारीला बेळगावात होणार नाट्यसंमेलन

6 फेब्रुवारी

  • स्थानिक कार्यक्रम : सी.पी.ए. क्रीडांगण

7 फेब्रुवारी

  • सकाळी 7 ते 10 नाट्यदिंडी
  • सकाळी 10 ते 1 उद्घाटन
  • दुपारी 3 पासून विविध कार्यक्रम

8 फेब्रुवारी

  • विविध कार्यक्रम
  • संध्याकाळी संमेलन समारोप

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close