14 फेब्रुवारीला पंतप्रधान बारामतीत

January 21, 2015 2:24 PM0 commentsViews:

Modi in baramati

21  जानेवारी :  ‘काका-पुतण्याच्या राजकारणापासून बारामती मुक्त करा’, विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीमध्ये असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला शरद पवार यांच्या एका कार्यक्रमासाठी बारामतीत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीआधी एकमेकांवर हल्लाबोल करणारे नरेंद्र मोदी आणि शरद पवार आता एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांच्या विद्या विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीला बारामतीला येणार आहेत.

यापूवच्ही पंतप्रधान बारामतीत येऊन गेले आहेत. त्यावेळी मोदींनी बारामतीत जाहीर सभा घेऊन, काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, इतक्या बोचर्‌या शब्दांत पवारांवर टीकास्त्र सोडले होता. पण आता चित्र पालटलं असून बारामतीमधील विविध विकासकामे, आदर्श गाव योजना किंवा महिला सक्षमीकरणाचे काम पाहाण्यासाठी पवारांनी मोदींना दिलेलं निमंत्रण मोदींनी स्वीकारलं आहे आणि येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला ते बारामतीत येणार आहेत. त्यामुळे आता साहजिकच या कार्यक्रमाला मोदी येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हेही या कार्यक्रमाच्या नियोजन समितीत आहेत. या नियोजन समितीची पवारांच्या बारामतीतल्या घरी आज बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, आणि पोलीस अधिक्षक, तसचं जिल्हाधिकारी उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close