शरद पवार आणि अण्णा हजारे यांची दिल्लीत भेट

August 31, 2009 11:56 AM0 commentsViews: 1

31 ऑगस्टअण्णांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपोषण करू नये,असं पवार यांनी म्हटलं आहे.यासाठी पवारांनी दिल्लीत अण्णांची भेट घेतली. अण्णांना पारनेर तालुक्यातले राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. तसंच आपल्या खुनाची सुपारी देणार्‍या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशा मागण्या अण्णांनी यावेळी पवारांकडं केल्याचं समजत आहे. नाहीतर 2 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला बसू असा इशाराही अण्णांनी दिल्याचं वृत्त आहे.

close