महाराष्ट्रात 13 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक

August 31, 2009 12:26 PM0 commentsViews: 2

31 ऑगस्ट राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी 13 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यात एकाच टप्यात ही निवडणूक घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरणे, छाननी मतमोजणीचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. 18 ते 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. 26 सप्टेंबर अर्ज छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची तारीख 29 सप्टेंबर असून, मतमोजणी 22 ऑक्टोबरला मतमोजणी होणार ओह. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 7 कोटी 56 लाख 34 हजार 525 आहे. त्यातील 80.35% जणांना निवडणूक ओळखपत्र मिळाल्याची माहीती चावला यांनी दिली. राज्यातील 82,028 मतदान केंद्रांवरही निवडणूक पार पडेल. त्याच बरोबर अरूणाचल प्रेदेश आणि हरीयाणातही 13 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

close