देशातल्या तीन राज्यात 13 ऑक्टोबरला निवडणुका

August 31, 2009 12:31 PM0 commentsViews: 1

31 ऑगस्ट महाराष्ट्र, हरियाणा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यात 13 ऑक्टोबरला निवडणुका होतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली. सोमवारपासूनच आचारसंहिता लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. महाराष्ट्रात एकूण 288 जागांसाठी लढत होईल तर अरुणाचल प्रदेशात 60 आणि हरियाणात 90 जागंासाठी मतदान होईल.महाराष्ट्रात 72 टक्के मतदारांची मतदान ओळखपत्र प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 7 कोटी 56 लाख 34 हजार 525 आहे. तर हरियाणात 1 कोटी 20 लाख 63 हजार 257 मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 82028 मतदान केंद्र तयार करण्यात येतील.अरुणाचल प्रदेशमध्ये 2,061 तर हरियाणात 12,894 मतदान केंद्र तयार केली जातील. 18- 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील तर, अर्ज छाननीची प्रक्रिया 26 सप्टेंबरला होईल. 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

close