कपिल सिब्बल यांची CBSE बोर्डासोबत बैठक

September 1, 2009 8:15 AM0 commentsViews: 7

1 सप्टेंबर मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी यंदा घोषित केलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या आमूलाग्र बदलांना प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांचीमंगळवारी दिल्लीत CBSE बोर्डासोबत बैठक आहे. पण, सिब्बल यांचा प्रस्ताव अंमलात आला तर राज्याच्या अखत्यारीत असलेल्या शिक्षण या विषयावर केंद्राचं नियंत्रण येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच देशभरातल्या काही राज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. यामध्ये CBSE म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची दहावीची परीक्षा ऐच्छिक करण्याचा प्रस्ताव सिब्बल यांनी ठेवला आहे. तसेच गुणांकन पद्धत रद्द करून ग्रेड पद्धत सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विद्यापीठात सरकारकडून कुलगुरु निवड करण्याची पद्धतही बंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्याऐवजी यापुढे स्थानिक पातळीवर निवड समिती नेमून कुलगुरुंची निवड करण्यात येईल. देशभरात दहावीच्या परीक्षेचं फक्त एकच बोर्ड असावं, असा सिब्बल यांचा प्रस्ताव आहे. UGC आणि AICTE रद्द करून उच्च शिक्षण नियंत्रणासाठी एकच मंडळ नेमावं असंही या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.

close