H1N1नं पुण्यात घेतला 32वा बळी

September 1, 2009 8:19 AM0 commentsViews: 4

1 सप्टेंबर H1N1च्या साथीने मंगळवारी पुण्यात 32वा बळी घेतला आहे. प्रियंका अंकुश शिळीमकर असं मृत पावलेल्या 7 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. प्रियंका भोर तालुक्यातल्या वीरवाडीमध्ये दुसरीत शिकत होती. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं तिला 29 ऑगस्टला पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या प्रियंकाचा मंगळवारी हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.

close