बाळासाहेब ठाकरे प्रचारात उतरणार – गोपीनाथ मुंडे

September 1, 2009 8:26 AM0 commentsViews: 6

31 ऑगस्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विधानसभेच्या प्रचारात उतरणार असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांनी दिली आहे. बाळासाहेब प्रत्यक्ष प्रचार मोहिमेत भाग घेणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रचार करणार, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. तर शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी विजयी सभेत यावं आणि ते जर आले तर सर्वांनाच आनंद होईल अशी प्रतिक्रिया दिली. येत्या निवडणुकीत आम्ही आघाडीला गाडून टाकू अशी प्रखर घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.

close