काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेत तडजोड केली-पर्रिकर

January 23, 2015 12:44 PM0 commentsViews:

parikar23 जानेवारी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय. काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या संरक्षण सज्जतेशी तडजोड केली, असा गंभीर आरोप पर्रिकर यांनी केलाय.

पर्रिकरांनी कुणाचं नाव घ्यायला नकार दिलाय. गेल्या महिन्यात कोस्ट गार्डला गुजरातच्या समुद्रात संशयास्पद पाकिस्तानी जहाज आढळलं होतं.

या जहाजाबद्दलची माहिती देण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्याला उत्तर देताना पर्रिकर यांनी हे वक्तव्य केलंय. त्यावर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close