नर्सरीत तीन वर्षाखालील मुलांना मिळालेले प्रवेश होणार रद्द

January 23, 2015 1:21 PM0 commentsViews:

school day23 जानेवारी : 31 जुलैला ज्या मुलांना 3 वर्ष पूर्ण होत नाही, पण अशा मुलांना नर्सरीत प्रवेश देण्यात आलाय, असे प्रवेश रद्द करण्यात येणार आहेत असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. इतकंच नाही तर अशा प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे शिक्षक संचालक महावीर माने यांनी ही माहिती दिलीये.

वयाची तीन वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनाच आता नर्सरीत प्रवेश देण्यात येणार असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

तीन वर्ष पूर्ण असल्यास नर्सरीला प्रवेश 4 आणि 5 अशी दोन वर्ष केजीची त्यानंतर 6 व्या वर्षी पहिलीला प्रवेश, असेच प्रवेश देता येणार आहे. अशा नियमानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई होणार आहे.

पण आता यावर्षी ज्यांनी आपल्या 3 वर्षांखालच्या मुलांचे प्रवेश घेतलेत, त्यांचे प्रवेश रद्द झाल्यावर पैसे परत मिळणार का ?, त्याच शाळेत परत पुढच्या वर्षी प्रवेश मिळणार असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close