बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात गावठी बॉम्बचा स्फोट, 2 ठार

January 23, 2015 2:10 PM0 commentsViews:

bihar_blast23 जानेवारी : बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा इथं दिवाणी कोर्टाच्या आवारात गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला. यात एक महिला आणि महिला पोलीस हवालदाराचा समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बिहारची राजधानी पटणापासून 60 किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या भोजपूर जिल्ह्यातील आरा इथं दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दिवाणी कोर्टाच्या आवारात स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

या स्फोटात एक महिला आणि महिला पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला.  या महिलेचा मृत्यू झाला, ती लॉक-अपकडे बॉम्ब घेऊन जात होती. एका महिला पोलीस हवालदाराला तिचा संशय आला आणि तिने तिला थांबवलं, तेव्हा या गावठी बॉम्बचा स्फोट झाला असं आराचे खासदार आर.के.सिंह यांनी IBN नेटवर्कला सांगितलंय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close