छेडछाडीला विरोध करणार्‍या कुटुंबाला बेदम मारहाण, दोघे अटकेत

January 23, 2015 3:57 PM0 commentsViews:

kurla_news3423 जानेवारी : आपल्या मुलीची छेड काढली याचा विरोध केला म्हणून एका टोळक्याने पीडित मुलीच्या आईलाच मारहाण केली. हे टोळकं एवढ्यावरच थांबलं नाहीतर मुलीच्या घरी जाऊन तोडफोड केली आणि तिच्या वडिलांना आणि काकांना बेदम मारहाण केली. या मुजोर टोळक्यातल्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय.

मुंबईतील कुर्ला भागातील कसाई वाडा इथं राहणारी पीडित तरुणी ही 11 वीत शिकते. याच परिसरात राहणारं तरुणांचं एक टोळकं गेल्या 5 ते 6 दिवसांपासून तिची छेड काढत होते, शेरेबाजी करत होतं. इतकंच नाही तर कुणाला सांगितलं तर तोंडावर ऍसिड टाकू अशी धमकीही त्यांनी दिली होती. ही गोष्ट या मुलीने आपल्या आईला सांगितली. काल संध्याकाळी ही मुलगी कॉलेजमधून परत येत असताना आईसमोरच तिची या मुलांनी छेड काढायला सुरूवात केली. त्याचा विरोध केल्यानंतर आईलाच त्यांनी मारहाण केली. नंतर त्या मुलीच्या कुर्ल्यातल्या घरी जाऊन घरातलं सामान अस्ताव्यस्त केलं. शिवाय मुलीच्या वडिलांना आणि काकांनाही बेदम मारहाण केली. या मुलीचे वडील सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती आहेत. तर काकाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झालीय. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्या आलीये. तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close