ठाण्यात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण

January 23, 2015 4:04 PM0 commentsViews:

thane_blasaheb_img23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन….बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात ठिकठिकणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बाळासाहेबांच्या मोठ्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आलं. ठाण्यातलं बाळासाहेबांचं स्मारक पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यांवेळी व्यक्त केला.

कोल्हापूर येथील कलाकार जे बी सुतार यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आलेल्या या चित्रासाठी 6 महिन्यापेक्षा अधिक काळ लागला आहे. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वारावर हे चित्र दिसणार आहे. आज रावते यांनी या तैलचित्रच उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेबांच्या जुन्या आठवणीना देखील उजाळा दिला आणि बाळासाहेब आणि ठाणे हे नाते उलघडून सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close