सरकारमध्ये आलो म्हणजे शेपूट घातलेलं नाही -उद्धव ठाकरे

January 23, 2015 6:56 PM1 commentViews:

uddhav thackarey tuljapur23 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर चांगलाच निशाणा साधला. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी थोडी तडजोड केली. याचा अर्थ आम्ही शेपूट घातली, असा होत नाही, अशी सणसणीत चपराकच त्यांनी भाजपला लगावलीय. निमित्त होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याचं.

आपल्या भाषणची सुरुवातच उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावत केली. कुठल्याही लाटेवर वाहत जाणारे ओंडके आम्ही नाही, असं उद्धव म्हणाले. केंद्रात भाजप सरकार येऊन वर्ष होत आलं आता कलम 370 रद्द करून समान नागरी कायदा लागू करा, असं आव्हानच त्यांनी मोदी सरकारला दिलं. हिंदूंना 10 मुलं जन्माला घालण्याचे सल्ले देता. पण, त्यांना पोसणार कोण, असा सवाल त्यांनी केला. नुसती मेंढरांची पिल्लं नको एक वाघ पुरेसा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटो प्रदर्शनातून 5 कोटी रुपये जमा झालेत. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

– शिवसेनाप्रमुखांना आज अभिमान वाटत असेल की, त्यांनी मर्द निर्माण केलेत षंढ नाहीत -उद्धव ठाकरे
– देशातले सर्व पक्ष विरोधात असूनही शिवसेना लढली आणि जिंकली, याबद्दल सुब्रण्यम स्वामी यांनी माझं अभिनंदन केलं -उद्धव ठाकरे
– हिंदूंना 10 मुले झाली पाहिजेत पण, त्यांना पोसणार कोण?, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
– हिंदू पंडितांनी आज टिवट् केलंय की, बाळासाहेब नसते तर आमची काय खैर नव्हती -उद्धव ठाकरे
– काश्मिरी पंडित मला आज भेटतात तेव्हा त्यांना मी, बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून त्यांना आनंद होतो-उद्धव ठाकरे
– शिवसेना कुणाच्याही लाटेवर निवडून आलेली नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला -उद्धव ठाकरे
– स्वातंत्र्यांनंतर हिंदुत्वही यायला हवं होतं -उद्धव ठाकरे
– पण काश्मीर निवडणुकीनंतर खरंच होणार आहे का हा खरा प्रश्न आहे -उद्धव ठाकरे
– भाजपला भरभरून जागा मिळाल्यात तर मग काश्मिरी पंडितांचीही घरवापसी व्हायला हवी -उद्धव ठाकरे
– काश्मिरमध्ये समान नागरी कायदा करा, 370 कलम काढून टाका, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन
– आमचं रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली, त्यामुळे मुंबईबद्दल जरासंही खुट्ट झालं की आमचं रक्त खवळतं -उद्धव ठाकरे
– शिवसेनाप्रमुखांचं स्मारक म्हणजे नुसता पुतळा नव्हे ! मी, त्यासाठी कोणाचेही उंबरठे झिजवणार नाही -उद्धव ठाकरे
– सुट्टीबहाद्दर संजय दत्तच्या सुट्टीवर उद्धव ठाकरेंची टीका
– सध्याचं फर्लो म्हणजे बाहेर येऊन फिरलो,चाललंय ते चालू दे -उद्धव ठाकरे
– आम्ही सत्तेत सहभागी झालोत पण सरकारजमा झालेलो नाहीत -उद्धव ठाकरे
– सरकारमध्ये आलो म्हणजे शेपूट घातलेलं नाही -उद्धव ठाकरे
– लोकांवर अन्याय झाला तर सरकारमध्ये असलो तरी शिवसेना अन्यायाविरूद्ध वार करेल -उद्धव ठाकरे
– आमच्यासमोरचे आदर्श हे अशोक चव्हाण नव्हे ज्यांनी मोठे मोठे अनधिकृत इमले उभे केलेत -उद्धव ठाकरे
– आमच्यासमोरचे आदर्श म्हणजे बाळासाहेब,स्वातंत्र्यवीर आणि शिवाजी महाराज -उद्धव ठाकरे
– उद्धव ठाकरे यांच्या फोटोप्रदर्शनीमधून उभी राहिलेले 5 कोटी रूपये आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना देणार
– फोटोग्राफी हा माझा छंद आहे तो मी दिवसाढवळ्या करतो -उद्धव ठाकरे
– तुम्ही तुमचे छंद दिवसाढवळ्या करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला
– मी माझ्या फोटोग्राफीचं प्रदर्शन हे आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी केलं आहे. माझ्या मजेसाठी नाही -उद्धव ठाकरे
– अंगात बाळासाहेबांचं रक्त वाहतंय जमलं असतं तर माझं रक्तही भगवंमय केलं असतं -उद्धव ठाकरे
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • annaraje bhosale

    only sena

close