पं. भीमसेन जोशींना जीवनगौरव

September 1, 2009 8:50 AM0 commentsViews: 1

1 सप्टेंबर स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना दिल्ली सरकारने 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर केला आहे. दिल्ली सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाकडून भीमसेन जोशींचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. 11 लाख रुपये आणि शाल असं या पुरस्कारचं स्वरूप आहे. पंडितजींचा यापूर्वी 'भारतरत्न पुरस्कारा'नं सन्मान करण्यात आला आहे.

close