मरिन ड्राईव्हवर ‘एलईडी’ लावले ही कुणाची हुकूमशाही ?-आदित्य ठाकरे

January 23, 2015 8:46 PM0 commentsViews:

aditya_thackarey544523 जानेवारी : शिवसेना आणि भाजपमध्ये आता मुंबईत लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्सच्या मुद्द्यावरुन जुंपली आहे. मरीन ड्राईव्हवर लावण्यात आलेले एलईडी लाईट महापालिकेला न विचारता लावले असून ही कुणाची हुकूमशाही आहे असा सवाल शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

केंद्र सरकारच्या योजनेतून मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी लाईट्स लावण्यात येणार आहेत. याबाबत शिवसेनेला विश्वासात घेण्यात आलं नाही असा आक्षेप सेनेच्या नेत्यांनी घेतलाय. याबद्दल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह वरती पिवळ्या रंगाचे स्ट्रिस्ट लाईट हे चांगले दिसतात. सफेद रंगाच्या लाईटमुळे मरिन ड्राईव्हची शोभा जाते. मरिन ड्राईव्ह वर लावण्यात आलेल्या एलईडी लाईटचा निर्णय हा हुकुमशाही पद्धतीने घेण्यात आलाय. ही कोणाची हुकुमशाही आहे,असा सवालच आदित्य ठाकरे यांनी भाजपचं नावं घेता टीका केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close