नालासोपार्‍यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

September 1, 2009 8:53 AM0 commentsViews:

1 सप्टेंबर नालासोपार्‍यात संतप्त रेल्वे प्रवाशांनी मंगळवारी रेल रोको केला. सलग दुसर्‍या दिवशी रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यानं संतापून चाकरमान्यांनी हा रेल रोको केला. विरारला जाणार्‍या गाड्या अडवल्या जात होत्या. पोलिसांनी आंदोलकाना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. तसेच जमाव नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. मंगळवारी सकाळी 7 वाजता दहीसर ते बोरिवली दरम्यान आणि सोमवारी भाईंदर स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल 15-20 मिनीटे उशिरानं धावत होत्या.

close