भारताने फुटबॉल नेहरू कप जिंकला

September 1, 2009 10:28 AM0 commentsViews:

1 सप्टेंबरभारताच्या फुटबॉल टीमनं नेहरू कप जिंकला आहे. फायनलमध्ये त्यांनी सीरियाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही टीम गोल करू शकल्या नाहीत. त्यामुळे एक्स्ट्रा टाईमचा वापर करण्यात आला. त्यात भारतानं गोल करीत आघाडी घेतली, पण सीरियानंही गोल करीत मॅचमध्ये बरोबरी साधली आणि मग टायब्रेकरमध्ये मॅच निकाली निघाली. दिल्लीतल्या याच आंबेडकर स्टेडियममध्ये दोन वर्षांपूर्वी सिरीयाला हरवत भारतानं नेहरू कप पटकावला होता. तसेच या मैदानावरची भारताची विजेतेपदाची ही हॅटट्रीक कामगिरी ठरली आहे. भारतानं 2007 मध्ये नेहरू कपमध्ये विजय मिळवल्यानंतर 2008 मध्ये एएफसी चॅलेंजर कप जिंकला होता. यापुढे सिनेस्टार सलमान खान भारतीय फुटबॉल टीमचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर असणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल ही यांनी घोषणा केली.

close