कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

September 1, 2009 10:31 AM0 commentsViews: 1

1 सप्टेंबर कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमधील 60 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेलेत. ठाणे महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलचे डीन प्रकाश शिलोत्री यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या डॉक्टरांनी हा संप पुकारला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद बर्वे यांनी दिली. निवासी डॉ.च्या खात्याअंतर्गत बदल्यांच्यावेळी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोप डीनवर करण्यात येत आहे. आरोप डीन आणि डॉक्टरांच्या भांडणाचा फटका पेशंट्सना बसतो आहे. कळवा शिवाजी हॉस्पिटलची ओपीडी बंद आहे. शिवाय दरदिवशी 20 ते 25 ऑपरेशन रद्द करण्यात आली आहेत. यासंदर्बात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांशी निवासी डॉ संपर्क साधला पण आचारसंहिता लागू असल्याने यात दखल घलता येणार नाही असा पवित्रा ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी घेतला आहे.

close