साखरेचे भाव 40 रुपये प्रति किलो होऊ शकतात- शरद पवार

September 1, 2009 10:34 AM0 commentsViews: 5

1 सप्टेंबरसाखरेचे दर 40 रुपये प्रति किलोपर्यंत चढू शकतील अशी शक्यता कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. आयबीएन नेटवर्कशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र ही दरवाढ केवळ साखरेचा देशातला साठा अपुरा असल्यामुळे होणार नाहीये तर साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांचा परिणाम म्हणून दरवाढ होऊ शकते असं त्यांच म्हणण आहे. साखरेचे दर आणखी वाढतील या शक्यतेला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज्‌नंही पुष्टी दर्शवली आहे. सध्या साखरेचे दर 33 ते 35 रुपये किलो आहेत आणि देशात साखर आयातही केली जातेय. तरीदेखील ही दरवाढ होणार असं दिसतंय.

close