बराक ओबामांचा आग्रा दौरा रद्द ?

January 24, 2015 1:14 PM0 commentsViews:

obama_aagra24 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यासाठी येणार आहेत. मात्र, नियोजित आग्रा दौरा रद्द करण्यात आलाय. 27 जानेवारीला बराक ओबामा आपल्या पत्नीसह ताजमहलला भेट देणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आग्रा दौरा रद्द करण्यात आलाय. त्याबद्दलची माहिती उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आली आहे. बराक ओबामा नवी दिल्लीतल्या सिरी फोर्टला भेट दिल्यावर अमेरिकेला परतण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यासाठी आज दुपारी वॉशिंग्टनहून रवाना होणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता ते भारतात येतील. त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात अनेक बडे अधिकारी असतील. ओबामा यांच्यासोबत मिशेल ओबामाही येणार आहेत. रविवारी राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी स्वागत समारंभ होणार आहे. सोमवारी ते प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, कालच ओबामांनी आपल्या एका मुलाखतीत दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, असा इशारा दिलाय. 26/11 च्या हल्ल्यातल्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलंय. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणं हा माझा मोठा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया ओबामांनी दिलीये. याबद्दल ‘व्हाईटहाऊस’नं एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात म्हटलंय की, “या भेटीची ओबामा यांना खूप उत्सुकता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होणार्‍या उत्सवाची ते आतुरतेनं वाट पाहतायेत. तसंच राजकीय नेते आणि अर्थातच पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होणार्‍या महत्त्वाच्या चर्चांबद्दलही ते आशादायी आहेत.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close