चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध दारू विक्रेते संघर्ष पेटला

January 24, 2015 5:02 PM0 commentsViews:

mungatiwar_23425 24 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी पुढाकार घेणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातल्या दारू विक्रेत्या लॉबीची दाऊद इब्राहिमशी तुलना केली होती. मुनगंटीवाराच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या दारु विक्रेत्यांनी मुनगंटीवार यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिलाय.

चंद्रपुरमध्ये दारुबंदी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयासाठी चंद्रपुरचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. दारूबंदी केल्यानंतर दुसर्‍या दिवशी चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचं जंगी स्वागत झालं होतं. तर दारू विक्रेत्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारच्या निषेध केला होता. यावेळी झालेल्या एका सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी दारु विक्रेत्यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी करुन दारुच्या कमाईतून कमावलेला पैसा बाहेर काढु असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या भाषणामुळे चंद्रपुरातली दारु लॉबी संतप्त झाली आहे न्यायालयात कालच या निर्णयाला दारु लॉबीने आव्हान दिले आहे. दारू विक्रेत्यानी पत्रकार परिषद घेऊन मुनगंटीवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले दारू विकुन सरकारला कोटयवधी रुपये कर देणारे दाऊद असतील तर आमच्याकडून कर वसुल करणारे राज्याचे मुख्यमंञी आणि अर्थमंञी सीमीचे कार्यकर्ते आहेत का असा प्रश्नच यावेळी उपस्थित केला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close