बराक ओबामा भारत भेटीसाठी रवाना

January 24, 2015 8:09 PM0 commentsViews:

obama3424 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यासाठी वॉशिंग्टनहून निघाले आहेत. उद्या (रविवारी) सकाळी भारतीय वेळेनुसार दहा वाजता ते भारतात येतील.

त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात अनेक बडे अधिकारी असतील. ओबामा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मिशेल ओबामाही आहेत. रविवारी राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलाय. सोमवारी ते प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, ओबामा आग्रा भेटीवर जाणार नाहीत असं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलंय. बराक ओबामा 27 जानेवारीला मिशेल ओबामांसह ताजमहलला भेट देणार होते. यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारला माहिती देण्यात आली होती. पण आता सौदीमध्ये ते दिवंगत राजे अब्दुल्ला यांना आदरांजली वाहण्यासाठी जाणार असल्यानं त्यांनी आग्रा दौरा रद्द केलाय.

एक नजर टाकूयात ओबामांच्या कार्यक्रमावर..

25 जानेवारी
- बराक ओबामांचं मिशेल यांच्यासह आगमन
- ITC मौर्यामध्ये जातील
- ओबामांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात शाही स्वागत समारंभ
-राजघाटावर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली
-हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
-मोदी – ओबामा पत्रकारांसाठी संयुक्त निवेदन करतील
-ITC मौर्यामध्ये परत येतील
-ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात शाही जेवण

-26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
- बराक ओबामा ITC मौर्यामधून निघून राष्ट्रपती भवनात जातील
- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बराक ओबामा राजपथावर जातील
- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर
- सीईओंसोबत गोलमेज चर्चेत सहभागी, पंतप्रधान मोदी या चर्चेत असतील
-सीईओंसोबतच्या चर्चेनंतर बराक ओबामा सीईओंना संबोधित करण्याची शक्यता
- पंतप्रधानांच्या 7 RCR या निवासस्थानी रात्रीचं जेवण घेण्याची शक्यता

- 27 जानेवारी
- बराक ओबामा ITC मौर्यामधून निघतील
- सिरी फोर्टच्या टाऊन हॉलमध्ये बराक ओबामा संबोधित करतील.
- त्यानंतर ताजमहलचा दौरा रद्द
-ओबामा दिल्लीहून सौदी अरेबियाला जाणार
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close