ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर

January 24, 2015 9:30 PM0 commentsViews:

arun sadhu424 जानेवारी : साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार-लेखक अरूण साधू यांना जाहीर झाला आहे.

एक लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुढील महिन्यात 27 फेब्रुवारीला नाशिकमध्ये अरूण साधूंना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

जनस्थान पुरस्काराचे यंदाचे हे 13 वे वर्ष आहे.  कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनीया पुरस्काराची घोषणा केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close