गॅस सिलिंडर मिळणार आता SMSवर

September 2, 2009 7:06 AM0 commentsViews: 31

2सप्टेंबरगॅस सिलेंडर आता फक्त एका SMS वर मिळणार आहे. SMS शिवाय एक टोल फ्री नंबरदेखील गॅस कंपन्यांसाठी सुरू होणार आहे ज्यावरून ग्राहक गॅससाठी ऑर्डर देऊ शकतील. गॅस वितरकाच्या दुकानात जाण्याचा वेळ वाचणार असल्यामुुळे ग्राहकांसाठी ही SMS आणि टोल फ्री नंबर सेवा खूप फायदेशीर ठरु शकते. गॅस बुकिंगसाठी SMS नंबर असे आहेत. इंडेन गॅस – 54625,भारत गॅस – 52725,HPCL गॅस – 9990923456. या नंबरवर LPG लिहून SMS करता येतो. ग्राहक आपल्या तक्रारी 155-233 टोल फ्री नंबर नोंदवू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी REG लिहून SMS करू शकतात. MTNL, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि टाटा इंडिकॉमच्या ग्राहकांना गॅस बुकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईसाठी ही सुविधा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

close