राजघाटावर ओबामांनी केलं बोधिवृक्षाचं रोपणं

January 25, 2015 1:29 PM0 commentsViews:

obama in rajghat25 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी यावेळी ओबामांनी वृक्षारोपण केलं. शांततेचं प्रतिक समजल्या जाणार्‍या पिपळाचं रोपटं अर्थात बोधिवृक्षाचं रोपणं केलं.

गेले अनेक दिवस संपूर्ण देशभरात ज्याची चर्चा होत होती, तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा आजपासून सुरू झालाय. आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल आपल्या भव्य आणि शाही एअर फोर्स विमानातून दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. ओबामांची गळाभेट घऊन मोदींनी त्यांचं स्वागत केलं. शिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधान स्वतः जात नाहीत, पण मोदींनी हा शिष्टाचाराला बगल दिली. भारतीय वंशाचे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्माही हजर होते.

स्वागत झाल्यावर ओबामा ‘द बीस्ट’ या आलिशान गाडीत बसून ‘आयटीसी मोर्य’ या पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या ताफ्याच अमेरिकन आणि भारत सरकारच्या किमान 50 गाड्या होत्या. हा एअरपोर्ट भारतीय वायूदलाकडे आहे. ओबामांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

त्यानंतर राजघाटावर जाऊन त्यांनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. गांधीजींच्या समाधीस्थळावर पृष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ओबामांनी शांततेचं प्रतिक असलेल्या बोधिवृक्षाचं रोपणं करून शांततेचा संदेश दिलाय. राजघाटावरील कार्यक्रम आटोपून ओबामांना हैदराबाद हाऊसमध्ये दाखल झाले आहे. इथं दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close