उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही – नारायण राणे

September 2, 2009 7:08 AM0 commentsViews: 2

2 सप्टेंबर उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही, माझ्याकडे अनुभव असल्याने गुणवत्तेनुसार आता मीही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ठाण्यात गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. विकासाच्या मुद्याला आपण प्राधान्य देणार असल्याचंही यावेळी ते म्हणाले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापाठोपाठ आता अनेकांना वेध लागलेत ते थेट मुख्यमंत्रीपदाचे.

close