एक ‘सेल्फी’ होऊ द्या…!!

January 25, 2015 2:32 PM0 commentsViews:

modi obama selfie25 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या दौर्‍याबद्दल अनेक विषयांची चर्चा होतीये. त्यातच आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा सेल्फी काढतील का? याची…

कारण हे दोन्ही नेते सोशल मीडिया फ्रेंडली आहेत.त्यामुळेच या दोघांचा एखादा सेल्फी पाहायला मिळेल का याची चर्चा होतीये. ट्विटर, फेसबुकवर खूपच लोकप्रिय असलेले हे दोन्ही नेते आहेत.

त्यामुळेच दोघांमधल्या भेटीच्या वेळेचा एखादा खास क्षण सेल्फीमधून पाहायला मिळेल अशी या दोन्ही नेत्यांच्या फॅन्सची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: विमानतळावर जाऊन ओबामांचं स्वागत केलं. नुसतं स्वागत केलं नाहीतर दोन्ही नेत्यांनी स्नेहपूर्ण गळाभेट ही घेतली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close