बंदुकीचा धाक, माओवादी घेतायेत गावकर्‍यांच्या बैठका

January 25, 2015 10:48 AM0 commentsViews:

25 जानेवारी : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांना विरोध करण्यासाठी माओवादी चांगलेच सक्रीय झाले आहेत. सुकमा, दंतेवाडा, बिजापुर, कांकेर, नारायणपूर या जिल्ह्यांमध्ये गावकर्‍यांच्या बैठका घ्यायला माओवाद्यांनी सुरुवात केली आहे. या बैठकीतून माओवादी गावकर्‍यांवर आपला जरब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात आदिवासी नागरीकांना गोळा करुन ही बैठक घेतली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी बारा जणांचे अपहरण करुन सरपंचपदाच्या उमेदवाराची हत्या केली होती.माओवाद्यांचे छत्तीसगडमध्ये बस्तरच्या जंगलात कसं समांतर सरकार सुरू आहे हे दाखविणारा हा व्हिडिओ आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close