ओबामांच्या ‘गॉड ऑफ ऑनर’चं नेतृत्व केलं एका महिलेनं !

January 25, 2015 3:36 PM0 commentsViews:

puja thakur25 जानेवारी : देशभरात घडणार्‍या महिलांवर अत्याचाराच्या घटना आणि महिलानं कमी लेखणार्‍या पुरूष प्रधान संस्कृतीला आज एक सणसणीत चपराक लगावली गेलीये.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचं भारतात शानदार स्वागत झालं. त्यांच्या स्वागतात एक अभिमानाची गोष्ट घडली. राष्ट्रपती भवनात ओबामांना जेव्हा गार्ड ऑफ ऑनर दिला, तेव्हा या ‘गार्ड ऑफ ऑनर’चं नेतृत्व केलं एका महिलेनं…विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सन्मानित करण्याची जबाबदारी एका महिलेनं अगदी सुत्रबद्ध आणि पूर्ण ताकदीने पार पाडलीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गॉड ऑफ ऑनर देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली याबद्दल मी खरंच भाग्यशाली समजते अशी भावना विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close