राजशेखर रेड्डींच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी

September 4, 2009 10:20 AM0 commentsViews:

4 सप्टेंबर वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हैदराबादच्या लालबहाद्दूर शास्त्री स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, वीरप्पा मोईली आदी नेत्यांनी रेड्डीच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी रेड्डींचं पार्थीव पुलिवेंदुला या त्यांच्या मुळ गावी नेण्यात आलं. बुधवारी सकाळपासून रेड्डींचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं. अखेर गुरुवारी एअरफोर्सच्या कमांडोंना कर्नूलपासून पूर्वेला 50 किलोमीटरवर जंगलात हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं. डोंगराला धडकून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. कर्नूल इथे त्यांचं पोस्टमार्टेम करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मृतदेहावर पुलिवेंदुला या त्यांच्या जन्मगावी शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

close